सद्गुरू नाथ महाराज की जय!
उपनिषद साहित्यात प्राचीन भारतीय तत्त्वविचार आले आहेत. उप या उपसर्गाचा अर्थ आहे ‘जवळ’ आणि सद् याचा अर्थ आहे बसणे. गुरूंच्या जवळ परमार्थ विद्या समजून घेणे असा याचा अर्थ आहे. वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ असेही म्हटले जाते. काही उपनिषदे गद्यात असून काही पद्यात आहेत. उपनिषदे तत्त्वज्ञान सांगतात म्हणून त्यांना ‘ब्रह्मविद्या’ असेही म्हणतात. सद्गुरू कृपेने गु.भ. प. श्री सुनील आठवले यांनी अगदी सोप्या पद्धतीने उपनिषदांचा सार आपल्याला समजून सांगितले आहे. त्याचा लाभ घ्यावा. read less